Thursday, December 6, 2012

शपथ

तुझ्या बोलक्या ओठांची शपथ..


तुझ्याखेरीज कुणीही आवडत नाही, दुसरं काही मनात उतरत नाही!



तुझ्या निळ्याशार डोळ्यांची शपथ..

समुद्रालाही ओहोटी लागते, पण माझ्या प्रेमाला नाही!



...तुझ्या निरागस हसूची शपथ..

मी विरघळलो तुझ्या प्रेमात, आता कशातच मिसळत नाही!



तुझ्या मिश्कील नजरेची शपथ..

हरवून गेलो मी त्याच्यात, आता मार्गच सापडत नाही!



इतकं प्रेम करतो मी तुझ्यावर..

तरी तू माझ्या डोक्यात जातेस..??



Valentine day पासून सुरवात झाली तुझी,

आता public holiday ला पण gift मागतेस..?



इतकी महागाई वाढली आणि तू मात्र,

रोज रोज Candle Light Dinner करू म्हणतेस..?



तुझ्या पेमात बुडून, गुदमरून प्राण जातोन माझा,

तू मात्र माझ्या तडफडण्याची मजा पाहतेस..?



खड्ड्यात घाल ते प्रेम आणि पुरून टाक मला..

थडग्यावरती स्मारक सांग सगळ्यांना,

"शहीद प्रेमवीर सखाराम साबळे

महागाईच्या युद्धात प्रेयसीचा

किल्ला लढवताना मरण पावला "
 
 
 
                             - विनंती विशेष