Wednesday, November 25, 2009
सलाम करो, सबको सलाम!!
काय मग मित्रहो, दिवसाची सुरवात कशी झाली आपल्या? आठवणींनी ना, २६/११ च्या? होणारच. वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या (आपली News channels हो!) या लोकांनी आपल्याला हा दिवस विसरू दिलाच नाही मुळी. हा, मध्ये मध्ये विसरलो होतो आपण पण २६ नोव्हेंबर जवळ आला की आठवतं सर्व काही, नाही का? चालायचंच. हे असंच होणार, जसं या वर्षीच्या २६/११ होतंय. तसंच पुढच्या वर्षीही होणार. शहिदांना श्रद्धांजली आणि पोलिसांना मानवंदना. आणि याला एक मस्त नाव दिलंय आपण- "Anniversary of 26/11" आणि यातून काय दाखवतोय आपण- "Mumbai Spirit". Great!! Really, Great Mumbai!! Hats off to the people who shout this is Mumbai spirit. पाडगावकरांच्या भाषेत सांगायचं तर सलाम! सर्वांना सलाम!! पाहायचंय कुणाकुणाला सलाम???
सलाम भाई-बहनों सबको सलाम,
ताज हॉटेलवरचं ऑपरेशन सलग दुसर्या दिवशीही चालू आहे हे कळताच बघ्यांची गर्दी करणार्या सगळ्यांना सलाम,
रस्त्यावर उतरून, निदर्शने करून, मेणबत्त्या लावून, शोकसभा आयोजित करून मिडीयासमोर झळकण्याची आशा पूर्ण करणार्या Celebritiesनाही सलाम;
सलाम मेरे भाई-बहनों सबको सलाम!!
Commando Operation Live Telecast करून त्याचे Upadates हल्ल्याचा MasterMindपर्यंत पोहोचवणार्या MEDIAला सलाम,
"तुमचे प्रियजन या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले, काय वाटतंय तुम्हाला?" असं विचारणार्या Reportersना सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
’त्या’ आतंकवाद्यांना बनावट IDs, Bank Accounts, Credit Cards, International Phones मिळवून देणार्या सगळ्यांना सलाम,
FBI च्या सूचना मनावर न घेणार्यांना सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
’त्या’ आतंकवाद्यांना भारतात गुजरातमधून घुसू देणार्यांना सलाम,
हंगामा माजवल्यानंतर एक कोटीची मदत देऊ करणार्याला सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
करकरेंच्या जाकीटची फाईल गहाळ करणार्याला सलाम,
तडफडणार्या साळसकरांना पाणी न देणार्याला सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
तीन दिवसानंतर दिग्दर्शक आणि पोराला घेऊन ताज मध्ये पाऊल ठेवणार्याला सलाम,
तर "बडी बडी शहरों में छोटी छोटी बातें होती रहती हैं" म्हणणार्या आबांना सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
मेला की लाख, जखमी झाला की काही हजार घोषित करणार्यांना सलाम,
उलटी-सुलटी विधाने करून दिशाभूल करणार्यांना सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
काही महिन्यांच्या आतच सगळं विसरून निवडणूक लढवणार्या नेत्यांना सलाम,
एवढंच नव्हे कामटे, करकरे, साळसकरांची होर्डिंग्ज लावून पक्षाचा प्रचार करणार्यांना सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
सहा महिन्यांनी खटला सुरू करणार्या सरकारला सलाम,
Legacy राहिली बाजूला पण, कसाबचं वकीलपत्र प्रसिद्धीसाठी घेऊ इच्छिणार्यांना सलाम;
सलाम भाई-बहनों सबको सलाम!!
आणि एवढे सगळे सलाs..म ठोकताना माझ्या क्रोधाला, रडण्याला, आक्रंदणार्या मनाला मात्र..
लगाs..म!!!
आजचा दिवस मुंबई; पण उद्या काय, परवा कोण...?
कदाचित पुणे, नागपूर, नाशिक की गोवा??
हैद्राबाद, बंगळूर, आसाम की नेहमीचंच कश्मीर???
बहुतेक प्रत्येकाच्या वाट्याला एक एक दिवस येईल.. हल्ल्याची Aniversary सेलिब्रेट करायला...
नाही! नाही!! अशी भीती मनात येतच राहते, याला उत्तर ते काय???
याला फक्त एकच उत्तर- लगाs..म!!!
जत्रा
जत्रा म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं हो? मला माहितेय, जत्रा म्हटलं की समोर येऊन उभा राहतो तो भरत जाधव, ओं..ओं.. करत, कोंबडी पळाली म्हणत. आणि मग आपणच जागच्या जागी टुणटुण उड्या मारायला लागतो. ओंजळीभर पाण्याने बाटलीत खुळखुळाट करावं ना तसं आपल्या मनाचं शरीरात चालत असतं.
पण जत्रा म्हटलं की अजूनही काही आठवत असेलच ना. आठवलं का?? हो, अगदी बरोबर. जत्रा म्हणजे जत्रा. त्याचा वेगळा अर्थ तो काय सांगायचा? पण जत्रा म्हणजे फेअर किंवा फेस्टिव्हल्स नव्हे. हो, पण तुम्हाला माहितेय मी जत्रांबद्दल मी का बोलतेय ते? कारण अगदी सोप्पं आहे. आमच्या कोकणात आता जत्रांचा मोसम चालू झालाय. कोकणात हिवाळा हा जितका थंडीचा मोसम असतो तितकाच तो जत्रांचाही असतो. आणि काय सांगू तुम्हाला जत्रा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. लहानपणीचे दिवस कोणते कोणते हे जर गोळा करू लागले ना तर मला त्यात जत्रेचे दिवसही मोजावे लागतील. आणि अशा या माझ्या आवडत्या जत्रांना मी गेली चार वर्षे फार मिस केलं हो. माझ्या गावालाही मला जाता आलं नाही. यावेळी मात्र अगदी पहिली जत्रा झाल्यापासून मी पप्पांच्या पाठीमागेच लागले, ’सांगा आपल्या गावची जत्रा कधी?’ उत्तर एकच- ’अजून वेळ आहे गं’. शेवटी एकदाची ती वेळ आली आणि परवाच मी आरोंद्याला जाऊन आले. तुम्हाला सांगते आपल्या ’गावची जत्रा कधी?’ याचं जे कुतूहल असतं ना ते एखाद्या घनिष्ट (आणि कधी कधी क्लिष्टही) अशा आपल्या आप्तेष्टाचं ’लग्न कधी?’ या कुतूहलाइतकं असतं. जेव्हा गावात एकापेक्षा अधिक जत्रा असतात तेव्हा तर हे कुतूहल अधिकपट असतं. सातेरीची जत्रा, गिरोबाची जत्रा, माऊलीची जत्रा वगैरे, वगैरे. पण आमच्या आरोंद्यात मात्र एकच मोठी जत्रा असते. सातेरी-भद्रकालीची.
तुम्हाला वाटेल माझं काय हे सतत ’आपलं गाव, आमची जत्रा’ चाललंय? मी तरी काय म्हणणार दुसरं? हा गावकी आपलेपणा जत्रेच्या वेळीच बाहेर पडतो. (होळीची धुळवड सोडली तर) इतर कुठल्याही सणासुदीला नाही बरं का. आणि आपल्या गावच्या जत्रेला जाणं हे आमच्यासाठी अनिवार्य असतंच.
जत्रेच्या दिवशी गाव कसं अगदी हुरळून गेलेलं असतं. गावतले सगळे कुटुंबकबीले देवदर्शनासाठी देवळात जातात. ओटी भरतात. तुम्हाला सांगते नवरा-बायको एकत्र गावात फिरताना दिसतात ते याच दिवशी. इतर गावातील लोक मात्र जत्रेसाठी येतात ते संध्याकाळीच. कारण जत्रेला खरा रंग चढतो तो संध्याकाळीच. संपूर्ण देऊळ आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर विद्युत रोषणाई (अर्थात lighintingने) उजळून निघतो. देवळाच्या आवारात शिरताच एक प्रकारचा हुरूप चढतो. एरव्ही सुनी सुनी दिसणारी मंदिरं जत्रेच्या दिवशी नववधूप्रमाणे नटतात. मंदिराच्या कळसापासून भींतीवर सांडणारी lightings पाहिली ना की असं वाटतं याच नववधूने जरीचा पदरच डोक्यावर घेतलाय आणि लाघवी हास्याने स्वागत करतेय सर्वांचं. lighting पाहून झालं की नजर खिळते ती ओळीत थाटलेल्या रंगीबेरंगी दुकानाच्या मांडणीवर. सगळ्यात जास्त जर कशाची दुकानं दिसतील तर ती खाजाची (मालवणी खाजं माहीत असेलच) आणि लहान मुलांच्या खेळण्यांची. तुम्हाला सांगते लहानपणी जेव्हा आम्ही जत्रेला जायचो तेव्हा आईबाबांकडे पहिल्यांदा फुग्याची मागणी करायचो. "पप्पा, मला फुगा.." कुठल्याही जत्रेत शिरलो की हाच dialog. "अगं थांब, अजून ओटी कुठे भरलीय? दर्शन कुठे झालंय देवाचं?" पप्पांनी असं म्हटलं की माझा थोडा हिरमोड व्हायचा. तेव्हा मला वाटायचं की जत्रा ही रंगीबेरंगी खेळणी आणि फुग्यांसाठीच असते. दर्शन काय नंतरही घेता येईल असं मला सारखं वाटायचं. पण माझं कोण ऐकणार तेव्हा?
मग चालू होतं देवळाच्या गाभार्यात शिरण्याची वाट काढणं. देवळापर्यंत पोहोचेपर्यंत थोडी रेलचेल, थोडी धक्काबुक्की यातून हा प्रवास चालू होतो. या प्रवासात मोकळ्या केसांच्या सुंदर मुली आणि जीन्स-जॅकेट घालून style मारणार्या मुलांच्या असंख्य रेल्वेही दिसतात. या रेल्वेगाडीत मी कुठच्या डब्याला जाऊन आदळणार नाही याची घरातलेही पुरेपूर घेतात. ’मेले में बिछडने जैसी’ गोष्ट होऊ नये म्हणून देवळात शिरेपर्यंत हातांची साखळी करूनच आम्ही चालतो. एकदा का देवळापाशी पोहचलो की मग प्रश्न उरतो चपला काढण्याचा. आता ही कुठे काढणार या विचारात पप्पांची एक-दोन मिनिटं जातात. मग इतर चपलांच्या ढिगार्यापासून बाजूला कुठल्यातरी खाचीत चपलं ठेवण्याची व्यवस्था केली जाते. त्याशिवाय चपलं नवीन खाली व वर जुनी चपलं ही काळजी घेतोच आम्ही. पण सगळ्यात मोठी पंचाईत होते, जेव्हा सगळी देवळं फिरून चपलं नेमकी कुठे काढली हे कुणालाच आठवत नाही तेव्हा. खूप शोधाशोध करून शेवटी ती मिळतात म्हणा. पण मग यावर अजूनएक उपाय सापडला तो म्हणजे केळीवाल्यांकडे केळी खरेदी करायची न चपलं राखणीला ठेवून द्यायची.
देवळात गेल्यावर सगळ्यांची एकच झुंबड उडते ती आपली ओटी सर्वात अगोदर भरण्याची. अजूनही मला माझ्या आईला ओटी भरताना बघायला फार आवडतं. तिचं ते अलगद हातांनी नारळ, तांदूळ घेऊन ओटी भरणं, मग गावकर्यानं गार्हाणं घालून झाल्यावर अलगद त्यातलं थोडं आपल्या पदरात परत घेणं हे सर्व बघताना मला फार मजा वाटते. बायका फार सोज्वळ दिसतात अशा प्रसंगाच्यावेळी. पण हे सौभाग्य फक्त सवाशिणींच्याच वाट्याला येतं, प्रत्येक विवाहितेच्या वाट्याला नाही याचं मला फार वाईट वाटतं.
परवा जेव्हा जत्रेला पप्पांसोबत जाऊन आले तेव्हा मात्र जत्रा जरा सुनी वाटली. दुकानं होती, पण लहान मुलांची, तसेच बायकांची झुंबड कमी दिसली. मुलामुलींच्या रेल्वेगाड्यांची ये-जा होतीच, पण काहीतरी कमी वाटत होती. नेमका जत्रेचा उत्साह कुठे हरवला तेच कळत नव्हतं. रात्री बारानंतर निघणारी देवाची पालकी आणि चालू होणारं दारूसामान बघायला मी व पप्पा काही थांबू शकलो नाही. परत घरी आल्यावर जेव्हा मी हा प्रश्न त्यांना विचारला तर काय उत्तर मिळालं ठाऊक आहे?
"अगं विने, आजकाल मटक्याला बंदी आणली ना सगळीकडे त्यामुळे जत्रेला फारसं कुणी येतच नाही. इतर लोकांपेक्षा या लोकांचा जत्रेतला उत्साह दुप्पट असतो. तोच आता मावळला ना."
लहानणी वाटायचं जत्रा फुग्यांसाठी आणि खेळण्यांसाठी असते. मग काही दिवसांनी कळलं की ती देवदर्शनासाठी असते. पण आता कळालं जत्रा हे लोकांनी एकत्र यावं, विचारांची (की पैशांची?) देवाणघेवाण व्हावी यासाठी असते.

Subscribe to:
Posts (Atom)